अचानक पुण्याचे तापमान घसरले आणि आमची परिक्षा सुरु झाली. थंडी एकदम वाढल्यामुळे सध्या आमचे बाळराजे गारठले आहेत. सर्दी मुळे त्याला खुपच त्रास होतो. दिवसा ठिक असतो मात्र रात्री थंडी वाढली की मात्र हैराण होतो (आणि आम्हाला हैराण करतो). सर्दी मुळे नाक बंद होते आणि मग श्वास घ्यायची पंचाईत होते. मग काय विचारायला नको. सध्या आमच्या घरात रात्रीच्या रागांची मैफल सुरु आहे. रोज नविन राग, रोज नविन संगित, श्रोते मात्र आम्हीच.
काल त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो, सर्दीचा त्याला खुप त्रास होतोय म्हणुन. डॉक्टरांनी सांगितले, हवामान परत बदलणार नाही याचा मला उपाय सांगा, मी बाळाला कधिच सर्दी होणार नाही असे औषध देतो. आता काय बोलणार! आमचा डॉक्टर पण एकदम फुल्लुस कॅरेक्टर आहे. त्यांनी बाळाला नाकात टाकायचे ड्रॉप्स दिलेत, मिठाचे पाणी आहे. बाळाच्या नाकात ड्रॉप्स कसे टाकायचे (तिचा हात भितीने थरथरतो) म्हणुन बायकोने आधी माझ्या नाकात ड्रॉप्स टाकले आणि मग बाळाच्या नाकात टाकायला सुरवात केली.
आता रात्री आळीपाळीने जागायचे आणि बाळाला सर्दीमुळे श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला की ड्रॉप्स त्याचा नाकात टाकायचे अशी 100 मार्कांची प्रात्यक्षिकांची परिक्षा सुरु आहे.
हि चाचणीच आहे अजुन अशा बर्याच परिक्षा पुढे द्यायच्या आहेत.
Friday, January 27, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
3 comments:
बाळाच्या नाकात कसे टाकायचे म्हणुन बायकोने आधी माझ्या नाकात टाकण्याचा प्रयोग केला आणि पुरेसी प्रॅक्टीस झाल्यावर मग बाळाच्या नाकात टाकायला सुरवात केली. लसी पण बाळाला टोचायच्या आधी मला टोचल्यानाहीत म्हणजे मिळविले.
:-)
Read this http://in.rediff.com/getahead/2006/feb/02lesson.htm
Post a Comment