छ्कुल्याची प्रगती खुप चांगली आहे. तो आताच पालथे व्हायला बघतोय. मात्र सद्ध्या तो आम्हाला रात्रीचे जागवतोय. कृपालीची तर पुरती दमछाक होते. तिला बिचारीला व्यवस्थित झोपायला सुद्धा मिळत नाही. बाळोबा आपले निवांत रात्रीचे जागे राहतात आणि सगळ्यांना जागवतात. सद्ध्या त्याचा दिनक्रम बदलला आहे. तो दिवसा मस्त झोपतो आणि रात्रीचे जागतो. नुसता एकटक छताकडे पहात बसतो. मांडीवर घेउन बसावे लागते. खाली ठेवले की रडायला लागतो. त्याला आता गुदगुल्या केलेल्या समजतात. पायांना गुदगुल्या केल्या किंवा नाकाला हळुच हात लावला की मस्त गोड हसतो. रात्रीच्या जागरणाचा सगळा शिण निघुन जातो.
छकुला काल दुपारी स्वत:च पालथा झाला होता असे कृपालीने मला संध्याकाळी ऑफिसहुन आल्यावर सांगितले. पुरुषांना बाळाचे "पहिले" बघण्याचे सुख फार कमी असते. मला त्याची प्रत्येक प्रगती बघायची आहे. बघुया संधी किती मिळते.
Sunday, January 15, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
He baakee khoop kharay kee purushaachyaa vaaTyaalaa bALAchyA
sarva pahilyaa haalchaalee paahNyaaach^ sukh naahee.
Anee hyaa goSHTeechee suruvaat
paar conception paasoonch!
baapaane kitihee baap vhaayach^ Thravl^ taree hyaaa babteet aa-ee-c baap aste!
ब-याच जणांचे 'metrosexuality' बद्दल भलतेच गैरसमज आहेत. पण माझ्या मते तरी ती एक compliment आहे. आणि तू metrosexuality च्या व्याख्येत चपखल बसतोस.
do visit my blog:
dusarichalwal.blog.com (blogspot नव्हे!)
Post a Comment