आज बर्याच दिवसांनी लिहीण्यास वेळ मिळाला आहे. एका प्रोजेक्ट मुळे अजिबात वेळच मिळाला नाही. आता परत लिहीण्यास सुरवात करतोय.
सध्या बाळाची प्रगती एकदम मस्त आहे. चार दिवसांपुर्वी त्याला पोलियो व काविळीची लस दिली. ईंजेक्शन देतांना पट्ठ्या अजिबात रडला नाही. त्यामुळे डॉक्टरांनी सुद्धा एकदम खुशीत ईंजेक्शन दिले. आता त्याचा दिनक्रम सुद्धा एकदम लहरीसुलताना सारखा झाला आहे. कधी दिवसा जागा राहतो व रात्री मस्त झोपतो तर कधी रात्रभर जागतो. त्यामुळे घरात आमचे घड्याळच बदलले आहे. आई सुद्धा कधी-कधी रात्रभर जागतात. ती एक बिचारी खुप काम करते. सकाळी पाच वाजल्यापासुन जे काही कामाला जुंपुन घेते ते रात्री उशीरापर्यंत काम करत असते. कधी-कधी रात्री सुद्धा बाळाबरोबर जागते. पुन्हा सकाळी पाच वाजता कामाला सुरवात. नातवाने आजीला सॉलीड कामाला लावले आहे.
10 फेब्रुवारी किंवा 15 फेब्रुवारीला बाळाचे बारसं करायचे ठरवले आहे. घरी कामं पडायला नकोत म्हणुन हॉलवर करणार आहे. तुम्हा सर्वांना आमंत्रण मिळेलच. सध्या बारश्याची एक तयारी सुरु आहे.
Tuesday, January 24, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
Hi Nilesh,
Liked your blog. My kid was born on 27th dec and hence i could identify with the experiences.
All the best for your future blogs.
Bye,
Ambarish
आईला! नेटवरून बारशाचे निमंत्रण बहुधा पहिल्यांदाच मिळेल! बाळाच्या बारशाला जरी येणे शक्य नसले, तरी पहिल्या वाढदिवसाला नक्की येईन.. :-)
Post a Comment