Wednesday, January 04, 2006

एक अनुभव्

लहानपणा पासुन बघतोय, आई लहान मुलांना मांडीवर घेऊन "दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असे म्हणायची. अजुनही म्हणते. तिला आजोबांनी असे म्हणायला सांगितले होते. तिला त्याचे कारण विचारल्यावर आई सांगते की असे बोलल्याने बाळ रडायची थांबतात, आणि हुशार होतात. आम्हाला चेष्टा वाटायची.
मला मुलगा झाला तेव्हा मला त्याचा अनुभव आला. बायकोचे सिझर झाल्यामुळे दोन दिवस बाळाला आईचे दुध देता आले नाही. बाळ भुकेमुळे रडायचा. मग मला आई काय करायची ते आठवले आणि तसे मी सुद्धा करयचे ठरविले. बाळाला मांडीवर घेउन मी सुदधा "दिगंबरा, दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा" असे गायला सुरवात केली, आणि काय आश्चर्य, बाळ थोड्यावेळातच रडायचे थांबले आणि एकटक माझ्या कडे बघायला लागले. मी हि घटना बायकोला सांगितली. तीने सुद्धा असे करुन बघितले आणि तीला ही माझ्यासारखाच अनुभव आला.

आज मी असे ठरविलेकी बाळाशी खेळतांना सगळेच काढतात तसे उगाच तोंडातुन चित्रविचीत्र आवाज काढायचे नाहीत. त्या ऐवजी अंक, पाढे, बराखडी वै. म्हणायची. लहाणपणापासुन हे त्याच्या कानावर पडल्याने, पुढे त्याची त्यातील गोडी वाडेल. ते त्याला नविन नसेल.
मला वाटते बाळ गर्भात असतांना आणि जन्माला आल्यावर, पालकांनी त्याच्या कानावर जर ठराविक गोष्टी जाऊ दिल्या तर आपण त्यांच्या करिअरची दिशा ठरवु शकतो.

2 comments:

गुरु said...

नमस्कार निलेश,

खरच, बाप होण्यासारखे सुख नाही. अर्थात ते बाप झाल्यावरच समजते :)

नविन पाहुण्याचे स्वागत आणि आपले अभिनंदन!

सर्जा
[एका बाळाचा बाप!]

nilesh.gawde said...

नमस्कार सर्ज्या,
आपलेही बाप झाल्याबद्दल अभिनंदन! तुम्ही सुद्धा तुमचे "बाप" अनुभव अवश्य लिहुन कळवावेत. तुमच्या अनुभवातुन मला शिकण्यास मिळेल, तसेच मला ही तुमच्या आनंदात सहभागी होता येईल.

धन्यवाद,

निलेश