Monday, January 09, 2006

"इतकी" बाळंतपण आणि त्यातुन उमजलेलं बायकांचे ज्ञान. .

आज घरात सगळे शांत आहे. माझ्या कालच्य गोंधळामुळे बाळाला गुटी वैगरे पाजने बंद झाले आहे. तरी मला सारखे टेंशन आहेच. काय आहे, ही मंडळी मी घरा बाहेर पडल्यावर, माझ्यामागे काय करतील सांगता येत नाही. त्यामुळे घराबाहेर असलो की सारखे, घरी बाळाला काही बाहेरचे दिले तर नसेलना असा सारखा विचार मनात येत असतो. घरी आल्यावर, विचारायची सोय नाही, पुन्हा भांडण आणी रडारड सुरु व्हायची भिती आहेच. त्यामुळे विचार करुन डोक्याची कलई झाली आहे.
बाकी आमचे बाळोबा एकदम मजेत आहेत. बाळाला गुटी देण्याचे कारण मी जाणुन घेण्याचा थोडा प्रयत्न केला. मला समजले की, बाळ दुध पिल्यावर शी करतो ती थांबावी म्हणुन गुटी. मी कपाळाला हातच लावला. म्हणजे ह्या समस्त बायकांनी जी काय एवढी बाळंतपनं काढलेली असतात त्यातुन ह्यांना ज्ञान असे काहीच मिळालेले दिसत नाही. ह्यांना बाळाची वाढ कधी-कशी होत तेच अजुन उमगलेलं नाही. बाळाला खरच कशाची गरज असते तेच नीट समजुन घेण्याचा प्रयत्न ह्यांनी केलेला नाही.
थोडक्यात काय तर केस बांधले की डोके चालत नाही. अहो चालणार तरी कसे, घोड्याला बांधुन ठेवले तर तो पळणार कसा. म्हणुनच की काय बहुतेक कर्तृत्वान स्त्रिया केसांचा बॉबकट करत असाव्यात.
बाळांचे सगळॆ मोठ्यापेक्षा वेगळे असते. ह्यांना कधीही शी होते, उलट्या होतात, उचक्या लागतात. हे सर्व त्यांचासाठी अगदी नॉरमल असते. बाळ जन्माला आल्यानंतर त्यांचा मेंदु त्यांच्या शरिराचा खर्‍या अर्थाने ताबा मिळवायचा प्रयत्न सुरु करतो. त्या सगळ्या प्रयत्नात बाळ बर्‍याच गोष्टी मोट्यांच्या दृष्टीने ऍबनॉर्मल अशा करतो, परंतु त्या बाळासाठी नॉरमल असतात. त्यांची पचनेंद्रिये व्यवस्थीत विकसीत होण्यासाठी थोडा कालावधी जावा लागतो. त्या दरम्यान सगळी नवजात बाळं दुध प्यायल्यावर शी, शु करतात. त्यात काळजी करण्यासारखे काही नसते. जसजसे त्यांची पचनांद्रिये विकसीत होत जातात, तसे त्यां हे प्रमाण कमी व्हायला लागते. उलट, जर बाळाने काहीच केले नाही तर मात्र काळाजी करावी, किंवा शीचा रंग बदलला तर काळजी करावी. इतर वेळेस काळजी करण्याची गरज नसते. एवढी गोष्ट, ह्या बायकांना "इतकी" बाळंतपण काढुन सुद्धा कळु नये? बरं बहुतेक सर्व डॉक्टर या बद्दल सर्व स्त्रियांना डिलेव्हरी नंतर समजाउन सांगतात. तरी हा गाढवपणा!
त्यामुळे कधी-कधी बाप झालो आहोत म्हणुन, पोराच्या हितासाठी कठोर वागावे लागते. त्याशिवाय असल्या गोष्टींना पायबंद बसत नाही.

आज बाळाबरोबर खुप वेळ नाही घालवता आला. मी घरी आलो तेव्हा बाळोबा गुडूकले (झोपले) होते. थोड्यावेळासाठीच राजे उठले. तेवढ्या वेळेत त्यांनी शी, शु चा कार्यक्रम उरकला, पोटोबा केला, इकडे-तिकडे काही दिसते का ते बघण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा निद्राधीन झाले. इतक्या थोड्या दिवसात बाळाची प्रगती एकदम चांगली आहे. आताच कुशी परततो. पाय मारुन वर सरकायचा प्रयत्न सुद्धा करतो. मान सुद्धा वर उचलण्याचा प्रयत्न चाललेला असतो. तो मान लवार सावरायला लागणार असे दिसतेय. कृपाली सांगत होती आज दुपारी त्याने, पायावर जोर देऊन कंबर उचलली होती दोन वेळा.
बापाच्या नशिबात "बाळाचे पहीले" बघण्याची संधीच खुप थोडी असते. आपल्याला कायम बायको कडुन ऐकुन समाधान मानावे लागते. हा आनंद आपल्या नशिबात खुप थोडाच लिहीला आहे.

1 comment:

Anonymous said...

तू बराच अभ्यास केलेला दिसतोय. पण एक सांगतो, 'निम-हकीम खतरे जान'! असो. आणखी एक मुद्दा, तू तुझ्या घरच्यांना आगदीच मूर्खात काढतोस. पण एक विसरू नकोस, या गुट्या चाटूनच तू लहानाचा मोठा झाला आहेस..!
आपल्या आज्या-मावश्यांना हल्लीच्या पाश्चिमात्त्य भाषेत स्पष्टीकरण देता येत नसले, तरी त्याचा अर्थ असा नाही की त्यांचे पारंपारिक ज्ञान बिनबुढाचे आणि निरुपयोदी आहे. तुला जितकी बाळाची काळजी आहे, तितकीच त्यांनाही आहे. आणि अनुभवाची महती मी तुला सांगण्याची गरज नाही. Experiance is always counted.
बाळोबाचा मामा,
ashish.scribe@gmail.com