बाळ, माझे स्वत:चे बाळ, प्रथम हातात घेण्याचा अनुभव अवर्णिय होता. माझी प्रथम संतती काही करणामुळे जन्मल्यानंतर आठ दिवसात वारली. हि घटना साधारण दिड वर्षापुर्वी घडली होती. त्यावेळेस, हाती पैसा असुनही, आपण किती गरिब आहोत याची जाणिव झाली. मगिल अनुभवामुळे या वर्षी जरा दडपण होते, पण सर्व काही व्यवस्थित पार पडले. आता घरातुन पाय लवकर निघत नाही. बाळाला बघत रहावेसे वाटते.
भरपुर झोपा कडतो, मग मस्त आळोखे-पिळोखे देत उठतो. जांभई दिल्यावर मस्त हसतो. सगळं काही एकदम मस्त. त्याला जन्माला येउन अजुन अवघे 10 दिवसच झाले आहेत परंतु तो आता पासुनच कुशीवर परतायला लागला आहे. मान देखिल ऊचलायला बघतो.
आजपासुन ह्या ब्लॉगवर त्याची प्रगती, त्याच्या गमती-जमती लिहीणार आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या आनंदात सहभागी व्हावे ही विनंती. मुलाला वाढविताना, संभाळतांना येणार्या अडचणी, अनुभव, होणार्या गमती-जमती मला तुमच्या बरोबर शेअर करायच्या आहेत. एक बाप म्हणुन येणारा अनुभव मला इतर बापांबरोबर शेअर करायचा आहे. आपण ही आपले अनुभव कळवावेत.
Note: This message is posted using Unicode in Devnagari (Marathi). You can publish your comments in English or Devnagari. To read the font, you will require to enable Indic Language support in your operating system. for details visit http://www.bhashaindia.com
2 comments:
abhinandan!
नमस्कार नंदन,
लिहील्याबद्द्ल धन्यवाद
निलेश
Post a Comment