Wednesday, January 11, 2006

छ्कुल्याचा प्रसाद...

आज माझी मावशी आणी तिचे सर्व कुटूंब पुण्याला आले होते. मावसभावाच्या मेव्हण्याचे लग्न होते आज पुण्यात. तिथुन ती सर्व मंडळी माझ्या घरी आली, छकुल्याला भेटायला. आजीने आणि आत्याने छकुल्याला नविन कपडे आणले आहेत. नेमके सगळे घरी आले तेव्हा बाळोबा झोपले होते. मग सगळे त्यांची झोप होईसतोवर वाट बघत बसले.
मावस भावाची मुलगी सुद्धा आली होती बरोबर. ती आता तिसरीत आहे. ऋचा तिचे नाव. तीला बाळ तिच्या मांडीवर पाहेजे होते. तिला बाळ झोपले आहे ते पटेचना. तिला वाटले तिच्या जवळ बाळाला द्यायचे नाही म्हणुन सर्व खोटे सांगत आहेत. पाच-सहा वेळा मागुन बघितले पण तेच उत्तर आल्यावर मग बाई साहेब रुसुन वर्‍हांड्यात जाउन बसल्या. काही खायला हवे का विचारले तर "नको". दुध प्यायचे का विचारले तर "नको". एवढ्यात बाळ उटलं. तसे तिला बाळ हवे का विचारले तर सवयिने तिने "नको" असे म्हंटले, मग एकदम तिच्या लक्षात तिची चुक आली तशी ती ताडकन उटली आणि दे, दे करुन ओरडायला लागेली. मग काय, आम्ही "आत तु नको म्हणालीस, मग आत नको" असे म्हणुन तिची थोडावेळ मस्करी केली. मग बाळाला घ्यायचे म्हणुन तिने सांगीतलेली सगळी कामे ऐकली.
थोड्यावेळाने बाळाला तिच्या मांडिवर दिल्यावर इतकी खुश झाली. पण आमचे बाळोबा तेव्हडेच खट्याळ. त्यानी लगेच तिच्या अंगावर सु केली. मग काय सांगु, ऋचाचा चेहरा इतका बघण्यासारखा झाला होता. तशात सुद्धा तिने एक चांगले केले बाळाला तिच्या मांडिवरुन उचले स्तोवर तिने अजिबात गडबड केली नाही. हुशार आहे पोरगी! बाळाला उचल्यावर मग तिने असे काही रडायला सुरवात केली, सगळे घर डोक्यावर घेतले.
छ्कुल्याने तिला आपला प्रसाद दिला.

3 comments:

Anonymous said...

ॠचा खरेच हुशार पोरगी म्हणायची. दुसरी एखादी असती तर बाळाने शुशू केली म्हटल्यावर ताडकन उठली असती.
ashish.scribe@gmail.com

Anonymous said...

सर्वप्रथम गुडियाची चर्चा इथे करत असल्याबद्दल क्षमस्व. पण एक पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून मला काही म्हणायचं आहे आणि आपल्या panchanama.blogspot.com या ब्लॉगवर non-bloggers ना मत नोंदवायची सोय नाहीये.
त्या वहिनीने ज्याप्रकारे गुडियाच्या खाजगी जीवनात सीमोल्लंघन केले ते कदापि समर्थनीय नाही. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे यास हा "बलात्कार" पाहणारे दर्शकही काही प्रमाणात जबाबदार आहेत. तुमच्या एकूण कथनावरून असे वाटते की तुम्हीही हा "बलात्कार" live पाहिलेला आहे. मग तुम्ही दोषी नाहीत का?
ashish.scribe@gmail.com

nilesh.gawde said...

panchnama.blogspot.com वर non-bloggersना मत नोंदवायची सोय नाही, हे निदर्शनास आणुन दिल्याबद्द्ल सर्वप्रथम धन्यवाद. आता तिथे सर्वांना मत नोंदवायची सुविधा उपलब्द केली आहे. आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद. तुमच्या ह्या अभिप्रायाबद्दल मी माझे मत panchnama.blogspot.comवर नोंदविले आहे.
धन्यवाद,
निलेश