केल्यानी. . . सर्वांनी माझोच बाबु केल्यानी. मी काल ठरावलेलय की माझ्या झिलाक (मुलगा) मीच न्हाउ घालतलय म्हणान. पण त्याचे आवशीन आणि आजीयेन माझोच बाबु केल्यानी, आता बोला! त्येंचोना पयला पासोनच ह्या बाबतीत माका विरोध होतो. माका माहिती होता ता, पण मी त्या कडे कानोडोळो केलय आणि काय सांगु चाकरमाण्यानु, थयच माझी फसगत झाली.
तुमका ठाउकच असात, मी तुमका काल सांगलेलय की माझ्या झिलाक ती मावशी न्हाऊ घालुक येता ता माका जरा देखिल खपना नाय. तसा वैद्द्यान पण सांगितल्यान. आणि त्यामुळे माझो ईचार आणखिनच पक्को झाललो. मी हाफीसातसुन घाराक ईल्यावर डायरेक डिकलेर करुन टाकलय "माझे झिलाक उद्यापासुन मी न्हाऊ घालतलय. त्या मावशेक निरोप धाड, उद्यापासुन हडे येउ नको". झाला. . घरात एकच गोंधळ.
घरातल्या सगळ्यांचो माझ्याकडे बघण्याचो दृष्टीकोनच बदाललो. माझी बायको माझ्याकडे अशा काय नजरेन बघाक लागली जसा काय मी कोणी राक्षसच आसय. घरातल्या सगळ्यांच्या बडबडीचो अर्थ एकच होतो - "बाळाचो बापुस, कृपालीचो घो, त्याच्या झीलाक स्वत: न्हऊ घालण्याचो जगायेगळा आणि एक अघोरी कृत्य करुक निघालोहा." मग काय सगळ्यानी माझ्या विरुद्ध बंड पुकारलो. माका वाळितच टाकला. सगळ्यानी माझ्याशी बोलुचा टाकला. मी काम करत बसलो तर माका जेउचा पण कोणी ईचारल्यानी नाय. माका कळला, ह्या सगळा कशासाठी चाललला ता, पण मी जरो देखिल डगमगुक नाय.
सकाळी सगळो येगळोच खेळ चललेलो. घरात सगळा शांत होता जसा काय आदल्यादिशी रातिक काय घडुकच नाय. माझी झोप मोडुक नये म्हणान सगळे घरात दबक्या पावलांनी वावरत होते. कोणी कालचो ईशय काडुक नाय. मावशी पण ठरल्यायेळेक ईली नाय. मी आतल्या खोलीत गेलो तर बायको झिलाक दुध पाजा होती. मी थोड्यायेळान आत गेलय तरी ताच. थोड्या येळान माका आईन कोळसे घेउन येऊक सांगिताल्यान. बाळाक धुरी देऊ साठी कोळशे लागतत. झाला मी थयच फसलो. मी आपलो गाफिल होउन कोळसे घेउक घराबाहेर पडलो आणि हयसर ह्यांनी बाळाचो आंघोळीचो कार्यक्रम उरकुन घेतल्यानी. आता मी घराकडे ईल्यावर माका समाजला सगळा. लय संताप झालो, पण सांगतलय कोणाक. माझ्या सुखाचो ह्या सर्वांनी असो कोळसो केल्यानी.
मगे मी ईचार केल्यावर माका समाजला, बाळाच्या बाबतीत आईच्या भावना जास्त महत्वाच्या असतत. जोपर्यंत त्येंच्या वागण्याचा बाळाक त्रास होणार नाही तोवर त्येंका त्येंच्या मनासारखा करुक देऊक काय हरकत नाय. आणि खरा सांगु आईच्या वागण्याचो बाळाक कधी त्रास होत नाय. आणखी येक सांगतय, कधी कधी बाळाचो बापुस खुप आगतिक असतो. त्येचा ही बाळासारखा होता, सांगुकहोव जमना नाय आणि सहनही करुचा लागता.
काय पटला ना!.
जाता शेवटची वाइच विनंती आसा, माझ्या झिलाचो बारसो करुचो आसा. त्याचा नाव काय ठेउचा ता सुचना नाय. पंचागाप्रमणे 'प', 'ट' आणि 'ण' अक्षरा इलित. पण त्याच्या वरुनच ठेऊचा असा काय नाय. तेव्हा तुमका काय तरी मस्त, सुंदर, आशयघन नाव सुचत असात तर जरुर कळवा.
Saturday, January 07, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
4 comments:
मालवणीत पोस्ट वाचून मजा इली. झिल तुमच्यावर गेलो वाटता, पहिल्याच वर्षात ब्लॉग सुरू केल्यान. :)
झकास!
पवन, नंदन,
तुमका माझो खटाटोप आवाडलो एकुन संतोष वाटलो. मी परत मालवणीत लिहीण्याचो प्रयत्न करेन. तुम्ही पण तुमच्या झिला वांगडाचो (बरोबरचे) अनुभव माका लिहुन कळवा.
तुमचोच,
निलेश
अजून सडोच आसंय मी. :-) त्यामुळे माका असले अनुभव लिहूक बरोच वेळ आसा. पण तुमच्या नवीन मालवणी लेखाची वाट बघतंय.
Post a Comment