Friday, September 15, 2006

प्रणवचे आताचे काही फोटो...

अरे हो.. प्रणवचे सद्ध्याचे काढलेले काही फोटो तुम्हाला दाखवायचे राहीलेच.............



परत आलो आहे...

नमस्कार!
खुप दिवसांची रजा घेतली. काही कामा निमित्ताने मला माझे अनुभव मांडता आले नाहीत, त्याबद्दल क्षमस्व!.....
प्रणवचे छान चालु आहे. येत्या 25तारखेला तो 10महिन्यांचा होईल. आता तो पुढे सरकायला लागला आहे. त्यामुळे आमची चांगलीच तारांबळ उडते. त्याला खाली पालथे ठेवले की घरभर पळतो (सरकतो). त्याला समोर दिसणारी प्रत्येक वस्तु धरायची असते. नुसते धरुन भागत नाही, तर त्याला ती तोंडात सुद्धा घालायची असते. त्यामुळे आता घरात सगळ्यांना सतर्क रहावे लागते. तो आता खुप काही तरी बोलायचा प्रयत्न करत असतो.. काय बरे............... हां...
"बा... बा....... मा... ब्रुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्......... आ........ ब्लब्ल.... क्ल..."
वैगरे.. काही कळत नाही... पण दाद मात्र द्यावी लगते....

त्याला काही ठराविक गाणी आवडतात... ती गाणी कानावर पडली की लगेच हात हलवुन नाचायला लागतो...मग टाळ्यानाही वाजवल्यातर नाराज होतो... आणि टाळ्या वाजल्या व एक पा दिला की स्वारी ईतकी गोड लाजते की... दिवसभराचा सगळा क्षीण निघुन जातो.. बाप होण्यातले सुख काय असते ते तेव्हा समजते...............

आता एवढेच ... परत भेटु...नक्की!

Monday, February 13, 2006

छकुल्याचे फोटो. . .

10 फेब्रुवारी 2006 रोजी आमच्या छकुल्याचे बारसे झाले. कार्यक्रम एकदम मस्त झाला. बाळाचे नाव "प्रणव" ठेवले आहे. बारश्याच्या दिवशी काढलेले प्रणवचे काही फोटो:



Friday, January 27, 2006

निसर्गाची लहर, आमची परिक्षा

अचानक पुण्याचे तापमान घसरले आणि आमची परिक्षा सुरु झाली. थंडी एकदम वाढल्यामुळे सध्या आमचे बाळराजे गारठले आहेत. सर्दी मुळे त्याला खुपच त्रास होतो. दिवसा ठिक असतो मात्र रात्री थंडी वाढली की मात्र हैराण होतो (आणि आम्हाला हैराण करतो). सर्दी मुळे नाक बंद होते आणि मग श्वास घ्यायची पंचाईत होते. मग काय विचारायला नको. सध्या आमच्या घरात रात्रीच्या रागांची मैफल सुरु आहे. रोज नविन राग, रोज नविन संगित, श्रोते मात्र आम्हीच.
काल त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो, सर्दीचा त्याला खुप त्रास होतोय म्हणुन. डॉक्टरांनी सांगितले, हवामान परत बदलणार नाही याचा मला उपाय सांगा, मी बाळाला कधिच सर्दी होणार नाही असे औषध देतो. आता काय बोलणार! आमचा डॉक्टर पण एकदम फुल्लुस कॅरेक्टर आहे. त्यांनी बाळाला नाकात टाकायचे ड्रॉप्स दिलेत, मिठाचे पाणी आहे. बाळाच्या नाकात ड्रॉप्स कसे टाकायचे (तिचा हात भितीने थरथरतो) म्हणुन बायकोने आधी माझ्या नाकात ड्रॉप्स टाकले आणि मग बाळाच्या नाकात टाकायला सुरवात केली.
आता रात्री आळीपाळीने जागायचे आणि बाळाला सर्दीमुळे श्वास घ्यायला त्रास व्हायला लागला की ड्रॉप्स त्याचा नाकात टाकायचे अशी 100 मार्कांची प्रात्यक्षिकांची परिक्षा सुरु आहे.

हि चाचणीच आहे अजुन अशा बर्‍याच परिक्षा पुढे द्यायच्या आहेत.