तुम्हा सगळ्यांका आम्हा उभयंतांचो सप्रेम नमस्कार!
आमच्या झिलाचो पहिलो वा(ला)डदिवस येत्या 25 तारखेक (25-12-2006) आसा. त्याचा कोडकौतिक करण्यात वर्ष कसा सरला ता समजलाच नाय. मनात आनंद असलो, समाधान असला की दिस कसे भुर्रकन उडुन जातत समजनाव नाय.
प्रणवच्या उज्वल भविष्यासाठी, त्याच्या पुढच्या वाटचालिसाठी तुम्हा सगळ्यांचो आशिर्वाद त्याच्या पाठीशी असुद्या. तुमचो आशिर्वादाचो, मायेचो हात त्याच्या पाठीवरुन फिरलो म्हंजे आमका सगळा गावला.
त्याच्या वाडदिवसाक तुम्हा सगळ्यांका आम्ही आमंत्रित करतोव. येउन त्येका आशिर्वाद देवा आणी आमच्या आनंदात सहभागी व्हा ही विनंती.
आपले विनीत,
कृपाली व निलेश गावडे
ता.क. खाली आमंत्रण पत्रिका जोडली आसा. काय चुकला-माकला आसात तर लेकरु समजुन पदरात घालुन घ्या.
